नावीन्य आणि परिचय ह्या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिनी. मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जूळतात,
म्हणून मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून नाविण्याची ओढ ही एक सहजावस्था आहे. कोणतीही देखणी वस्तू तत्क्षणी आवडते. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली,
तर सगुण साकारापलीकडचं सौदर्य दिसू लागतयं, अनुभवायला मिळतयं अस समजावं.